You are currently viewing कुंभारमाठ येथील निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम थांबवले…

कुंभारमाठ येथील निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम थांबवले…

मालवण :

 

कसाल मालवण मुख्य रस्ता ते हुतात्मा स्मारक पर्यत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण काम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करत भूमिपूजन झालेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे दाखवून देत ग्रामस्थांनी या रस्ता कामाची मंगळवारी पोलखोल केली.

हुतात्मा स्मारक मार्गावरील रस्ता काम करताना डांबर वापर न करता तसेच रस्त्यावरील माती कचरा बाजूला न करता खडी पसरवून काम सुरू होते. याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश गावकर व काही ग्रामस्थांनी सुरवातीला हे काम रोखले. त्यानंतर मंदार लुडबे, माजी उपसरपंच ग्रा.प. सदस्य मनोज वाटेगावकर, प्रसाद परुळेकर, मयुर कदम, सागर वाटेगावकर, दिलीप सांगवेकर, सुनील मालवणकर, वस्त व ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणी येत काम थांबवले.

पसरलेली खडी कामगारांना काढण्यास सांगितले असता खाली डांबर नसल्याचे स्पष्ट झाले. मातीही बाजूला केली नव्हती. काम थांबवून माती बाजूला करत त्यांनंतर रस्त्यावर योग्य प्रमाणात डांबर घालून पुन्हा खडीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. उपस्थित संबंधित अधिकारी यांनी रस्ता कामात झालेली चूक मान्य केली. तसेच पुन्हा काम करण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − nine =