You are currently viewing शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी, अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी न.प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ॲड. निता सावंत, बाबु कुडतरकर, आर्किटेक्ट अमित कामत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, म.ल.देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी ऑनलाईन उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला भोसले नॉलेज सिटीच्या मुलांनी स्वागत व विज्ञान गीत सादर केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी यांनी तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमापूर्वी मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉललाही भेट देत पाहणी केली तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा