You are currently viewing पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी

*वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांचे आवाहन*

 

वैभववाडी :

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांनी ई केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकातून केली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील 1575 लाभार्थ्यांची बँक खाती आधारला संलग्न नाहीत. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार लाभार्थ्यांची बँक खाते आधार संलग्न नसतील तर सदर योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळणार नाही. तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान (पीएम किसान) योजनेचा पुढील लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार सलग्न केलेले नसेल तर तात्काळ करून घ्यावे.

तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ई. केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे तहसीलदार सौ. देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 2 =