You are currently viewing माणगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी सचिन धुरी यांची निवड

माणगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी सचिन धुरी यांची निवड

कुडाळ :

माणगाव गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा एकदा सचिन धरी यांची निवड झाली असून सलग सात वेळा तंटामुक्ती अध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. माजी सरपंच, माजी उपसरपंच, चार वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिलेले सचिन धुरी हे भाजपचे विभागीय अध्यक्ष आहेत.

पुन्हा एकदा तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याने गावातील तंटे व वादविवाद गावातच मिटवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सचिन धुरी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा