You are currently viewing लावणी : डॉक्टर

लावणी : डॉक्टर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी श्री.विलास कुलकर्णी (आप्पा) लिखित अप्रतिम लावणी*

 

*लावणी : डॉक्टर*

 

वैद्य हकीम यांचा कडूजार दवा

बाई मला एमडीच डॉक्टर हवा l ध्रु l

 

मोठ्या कुळवंताची सुशील नार

फी चांगली त्यानं मागावी हजार

समजेना तरी लिखाणात गोडवा

बाई मला एमडीच डॉक्टर हवा l १ l

 

एक्स रे झाले की सी टी स्कॅन

रक्त तेच तेच तपासणी नवीन

हात ना लावता देईल जो दवा

बाई मला एमडीच डॉक्टर हवा l२l

 

नाव त्याचं सांगता वाढेल शान

तालेवार बोलेल मला शेजारीण

घरीदारी करतील सख्या माझा हेवा

बाई मला एमडीच डॉक्टर हवा l ३ l

 

विलास कुलकर्णी

( आप्पा महाराज )

मीरा रोड

२१.११.२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा