You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १४ तारखेला मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतिषबाजी

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १४ तारखेला मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतिषबाजी

जुबिन नोटीयाल कार्यक्रमात रिस्ट बँड वाल्यांना प्रथम प्राधान्य; अन्य प्रेक्षकांना थेट प्रवेश

 

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती..

 

 

सावंतवाडी:

 

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जुबिन नोटीयाल यांच्या कार्यक्रमासाठी “रिस्ट बँड” शिवाय प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर १४ तारखेला येथील मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. ती पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. परब यांचा वाढदिवस १५ तारखेला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी कुडाळचे तालुकाध्यक्ष दादा साईल, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, या ठिकाणी नौटीयालच्या कार्यक्रमासाठी “रिस्ट बँड” बंधनकारक करण्यात आले होते. परंतु प्रेक्षकांची वाढती संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी बँड शिवाय प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जे येतील त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ५० हजार हून अधिक प्रेक्षक जिल्हाभरासह आजूबाजूच्या राज्यातून येणार आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे, असे परब म्हणाले. यावेळी रिस्ट बँड वाल्यांना प्रथम प्राधान्य व राखीव जागा देण्यात येणार आहे. तर अन्य लोकांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 13 =