You are currently viewing विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा व मानधनात वाढ द्या

विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा व मानधनात वाढ द्या

विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा व मानधनात वाढ द्या

*शिक्षक परिषदची मागणी*

सिंधुदुर्ग

विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) काम करणाऱ्या शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविका व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी आणि त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी महाराष्ट्र महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी हे निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) काम करत आहेत.

या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १ मार्च २०२६ ते १५ एप्रिल २०२६ आणि दुसऱ्या टप्प्यात १ जुलै २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अनेक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम पूर्ण केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या कामासाठी राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील शिक्षक, तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियमित कामकाजासोबत विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे अतिरिक्त काम पार पाडताना या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण आला.

त्यामुळे विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) काम करणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी, तसेच त्यांनी केलेल्या अतिरिक्त व विशेष स्वरूपाच्या कामाचा विचार करून मानधनात योग्य ती वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने केली आहे.

या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे काम जबाबदारीने पूर्ण केले असल्याने शासनाने त्यांच्या परिश्रमाची दखल घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष रजा आणि मानधनात मिळाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या अतिरिक्त सेवेबद्दल योग्य सन्मान व दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक मा. आ. श्री. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी विविध प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. या निवेदनावर राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची स्वाक्षरी असून, विशेष मतदार पुनर्निरीक्षणाच्या कामात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष रजा व मानधनात वाढ मिळावी, या मागणीमुळे आता शासनाच्या निर्णयाकडे शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

_________________________
*संवाद मीडिया*

✨ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* ✨
“जग तुमची वाट पाहत आहे…”
🏖️ देश असो वा परदेश — तुमच्या प्रत्येक प्रवासाची संपूर्ण सोय एकाच ठिकाणी !
📝 *आमच्या सेवा :*
🛂 पासपोर्ट हेल्पडेस्क
🛃 व्हिसा हेल्पडेस्क
🇮🇳 भारतीय सहली
🌎 परदेशी सहली
✈️ विमान तिकीट बुकिंग
🚆 रेल्वे तिकीट बुकिंग
🚌 बस तिकीट बुकिंग
💸 मनी ट्रान्सफर
💱 करन्सी एक्सचेंज
🛡️ ट्रॅव्हल इन्शुरन्स
🛳️कॉर्डेलिया क्रूज बुकिंग
🏨 हॉटेल बुकिंग
🚗 कार ऑन रेंट
🚤 हाऊसबोट बुकिंग
🌟 फॅमिली ट्रिप | हनिमून | धार्मिक यात्रा | ग्रुप टूर | देश-विदेश प्रवास 🌟
📞 आजच संपर्क करा!
*7350 7350 91 // 7350 534 534*
📍 *कणकवली, सिंधुदुर्ग*
✈️प्रवास सुखाचा, आठवणी आयुष्यभराच्या!✈️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/211736/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा