You are currently viewing बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना धोका

बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना धोका

बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना धोका

:बिपरजॉय चक्रीवादळ  येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.’

महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही

भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ पुढील 12 तासांत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता

सध्या हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये आदळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुजरातमध्ये जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटलं आहे की, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील 12 तासांत अत्यंत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. देशात चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ पुढील 24 तासांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतासह ‘या’ देशांवर चक्रीवादळाचा परिणाम होणार

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या इतर देशांचा समावेश आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो. येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 10 =