You are currently viewing राज्यपाल पदावरून कोश्‍यारी यांना हटविण्यात यावे…

राज्यपाल पदावरून कोश्‍यारी यांना हटविण्यात यावे…

नवी दिल्ली – 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत पत्र पाठवून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्यघटनेचा अवमान आणि भंग केला आहे. त्या कृतीबद्दल कोश्‍यारी यांना राज्यपालपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी डाव्या पक्षांकडून करण्यात आली आहे.

कोश्‍यारी यांनी पत्रात ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष बनला आहात का, असा आक्षेपार्ह सवालही विचारला. त्यावरून डाव्या पक्षांनी कोश्‍यारी यांना लक्ष्य केले आहे. भारत धर्मनिरपेक्षतेविषयी वचनबद्ध राहणार असल्याची ग्वाही राज्यघटनेतून देण्यात आली आहे.

त्यामुळे राज्यपालपद स्वीकारताना कोश्‍यारी यांनी घेतलेल्या शपथेचा भंग त्यांच्या सवालामुळे झाला आहे.

ते राज्यपालपद भुषवण्यास समर्थ नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना हटवावे, अशी मागणी भाकपने एका निवेदनाद्वारे केली.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही भाकपप्रमाणे भूमिका मांडली. राज्यपाल म्हणून कोश्‍यारी यांच्याकडून झालेली घटनाभंगाची कृती अस्वीकारार्ह आहे. राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती रद्द करावी, असे ट्‌विट येचुरी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =