You are currently viewing भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी मोदी @9 अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविणार – चंद्रकांत जाधव

भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी मोदी @9 अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविणार – चंद्रकांत जाधव

शासनाचे निर्णय, विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणार

सावंतवाडी

मोदी @9 अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी भाजपाच्या माध्यमातून विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या माध्यमातून झालेल्या विविध कामे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली. दरम्यान या ठिकाणी मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांचा विचार करून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचा फायदा लोकांना झाला आहे. विशेषतः शेतकरी व महिलांसाठी घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरणारे आहेत, असे ही त्यांनी सांगितले.
हे अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. जाधव यांनी आज येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय सावंत, परिक्षीत मांजरेकर, अक्षय साईल, वासुदेव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. जाधव म्हणाले, या अभियाना अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडुन राबविण्यात येणार्‍या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. यात योगा दिन, मोटार सालकल रॅली, घरोघरी संपर्क, मन की बात, लाभार्थी संपर्क, बुध्दीवंत संमेलन, व्यापारी संमेलन, पत्रकार परिषद, सोशल मिडीया, जेष्ठ कार्यकर्ता सत्कार, संपर्क से समर्थन, जाहीर सभा, कमळ स्टीकर लावणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे श्री.जाधव म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा