सेवाभावी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि उर्वी फाऊंडेशन यांच्या वतीने पोलिस कर्मचाऱ्यां पाणी बॉटल व बिस्कीट वाटप..

सेवाभावी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि उर्वी फाऊंडेशन यांच्या वतीने पोलिस कर्मचाऱ्यां पाणी बॉटल व बिस्कीट वाटप..

सावंतवाडी

कोरोना काळात दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करत गड किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देणारी सेवाभावी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आणि उर्वी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पाणी बॉटल व बिस्कीट यांचे वाटप केले आहे.

सद्य स्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबदी लागू करण्यात आली असून, अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, अशा परिस्थितीत देखील आपले कर्तव्य बजावत भर उन्हात पोलिस कर्मचारी उभे असतात. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी दुर्गसेवक सुधीर राऊळ, रोहन पुळस्कर, सूरज सावंत, सिद्धेश परब, अमित राऊळ, आदी उपस्थित होते. तसेच पोलिस कर्मचारी प्रवीण सापळे, सखाराम भोई, प्राजक्ता कदम, तृप्ती कलगुटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा