You are currently viewing जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणारच

– आमदार नितेश राणे

कणकवली
आम्ही आव्हान दिले म्हणून तरी डीपीडिसी ची मिटिंग लावली आहे. डीपीडिसी ची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होणार नाही असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. आम्हाला पालकमंत्र्यांना अडविण्याची हौस नाही, अडवणे हा हेतू सुद्धा नाही. मात्र जिल्ह्यातले प्रश्न, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी थांबवत असू आणि पालकमंत्री म्हणून ते थांबून एकूण घेणार नाहीत काय ? आणि ते थांबणार नसतील तर मग अडवावेच लागेल, असा इशारा दिला.

पालकमंत्री हे डीपीडिसी चे मालक नाहीत. ते अध्यक्ष आहेत, डीपीडिसी चा निधी वाटप सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. डीपीडिसी निधी वाटपात पालकमंत्री राजकारण करत आहेत.डीपीडिसी मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणारच असा इशारा देत आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्र्यांनी दोनवेळाच्या जेवणाचा डबाही आणावा अशा शब्दांत आगामी डीपीडिसी मिटिंग ची झलक आमदार नितेश राणेंनी बोलून दाखवली.
राजशिष्टाचार जिल्हाधिकारी पाळत नाहीत.शासकीय आढावा बैठकीत कोण बसावे कोण नाही हे घटनेने सांगितलेले आहेत.ते जर पायदळी तुडवत असतील तर खपवून घेणार नाही.

एसटी च्या संपताला आमच्या भाजपा चा पूर्ण पाठींबा आहे. न्यायालया समोर मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्या नावाने सुसाईड नोट लिहिल्या आहेत. स्वतःच्या मुलांसाठी धावतात एसटी कामगारांच्या मुलांसाठी याना वेळ नाही अशी टीका केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा