डॉ. चितारी यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात रुजू करा…..

डॉ. चितारी यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात रुजू करा…..

सावंतवाडी तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने डॉ. पाटील यांना घेराव घालत केली मागणी

सावंतवाडी प्रातिनिधी
डाॅ. चितारी यांना पुन्हा सावंतवाडीत आणण्यात यावे अशी मागणी आज सावंतवाडी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. उत्तम पाटिल यांना घेराव घालून मागणी करण्यात आली आहे .

डॉ अभिजित चितारी यांची बदली करण्यासाठी जर आपणावर दबाव आणला जात असेल तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून त्यावर तोडगा काढू असे देखील दोन्ही पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी त्यांना सागितले आहे पण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करून डॉ चीतारी याना त्वरित सावंतवाडीत सेवा देण्यास रुजू करण्यात यावे असे सागण्यात आले आहे.

यावेळी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस आनंद परुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, चित्रा देसाई, पपू शेख, शिवम सावंत, राकेश चितारी, मोहसिन मुल्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा