You are currently viewing 30 एप्रिलपर्यंत आयुष्मान कार्ड विनामूल्य बनवा..

30 एप्रिलपर्यंत आयुष्मान कार्ड विनामूल्य बनवा..

उपचारासाठी 5 लाख मिळवा…

 

गरिबांना उपचारासाठी खर्च करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) सुरू केली. ज्या अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. यासाठी त्यांना आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. हे कार्ड तयार करण्यासाठी आधी 30 रुपये शुल्क भरावे लागले. परंतु कोरोना काळात मोदी सरकारने यासंदर्भात जनतेला मोठा दिलासा दिलाय. आता कोणतीही व्यक्ती आयुष्मान भारत कार्ड पूर्णपणे विनामूल्य मिळवू शकते आणि उपचारासाठी आर्थिक लाभ घेऊ शकते.

*आयुष्मान कार्डचे फायदे*

आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्डधारकांना त्यांच्या आजारावर सरकारी रुग्णालयात सहज उपचार करता येतात. या माध्यमातून त्यांना उपचारासाठी विम्याचे पैसे मिळू शकतील. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी 5 लाख रुपये दिले जातात.

*कार्ड कसे तयार करावे?*

कार्ड बनविण्यासाठी आपण शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता. एकदा नोंदणी झाल्यानंतर मोहिमेशी संबंधित कर्मचारी आपल्या घरी येतील आणि संपूर्ण तपशील घेतील. यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळेल. ते पीव्हीसीच्या स्वरूपात असेल. म्हणजेच ते एटीएम कार्डसारखे दिसेल, ते खराब होणार नाही. हे कार्ड विनामूल्य दिले जाईल.

 *30 एप्रिलपर्यंत विनामूल्य बनवू शकता कार्ड* 

आयुष्मान कार्ड विनामूल्य बनवण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबविली जाते. त्याअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे गोल्डन कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय सुविधा मिळण्याची तरतूद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 4 =