You are currently viewing ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन

मुंबई:

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. दादर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, ५ जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 4 =