You are currently viewing कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा

कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा

*कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा*

*आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना*

कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने आज कोळंब ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार श्रीम. झालटे यांना दिल्या.मालवण तहसीलदार पदी श्रीम. झालटे यांची नियुक्ती झाल्याने त्यांना आ. वैभव नाईक यांनी शुभेच्छा देत मालवण तालुक्यातील इतर प्रश्नांबाबत चर्चा केली.

याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नायब तहसीलदार कोकरे, कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, नितीन नेमळेकर, शहर प्रमुख बाबी जोगी,सन्मेष परब, हेमंत मोंडकर,दादा पाटकर,दिलीप घारे, सिद्धेश मांजरेकर,बाबू वाघ आदिंसह कोळंब ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 13 =