You are currently viewing कुसुम सामंत यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

कुसुम सामंत यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

मालवण

घुमडे येथे काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ. कुसुम दत्तात्रय सामंत यांना महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन उपसरपंच राजू सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सौ. सामंत यांनी गेल्या काही वर्षांत गावातील महिलांना पर्यटन व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून देण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसरपंच राजू सावंत, ग्रामसेविका युती चव्हाण, माजी सरपंच चंदा वस्त, अंगणवाडी सेविका सुप्रिया बिरमोळे, आरती बिरमोळे, सरिता बिरमोळे, योगिता जाधव, विश्वजा सामंत, संगीता वालावलकर, श्वेता टेंबुलकर, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील टेंबुलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − seven =