*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 28/06/2025 रोजी बांदा पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा जी. प. शाळा नं.१ बांदा येथे सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये बांदा गावचे सरपंच सौ.नाईक मॅडम, डिंगणे सरपंच दळवी सर,भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सौ.कोरगावकर मॅडम, उपसरपंच राजाराम सावंत सर , बांदा शाळेचे मुख्याध्यापक सर, पाटील सर, ग्रामपंचायत सदस्य मॅडम तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले, दळवी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने सरस्वती देवीला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच बांदा गावचे सरपंच सौ.नाईक मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. व दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ घ्या व या मेळाव्याचे तुम्ही फायदा करून घ्या असे आवाहन बांदा सरपंच सौ. नाईक मॅडम यांनी केले.तसेच सौ.कोरगावकर मॅडम यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. व दहा दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली.या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. मा. सौ.कोरगावकर मॅडम यांनी दिव्यांगासाठी उपहाराची व्यवस्था केली.साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे सर यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे महत्त्व पटवून दिले.सामाजिक बांधिलकी संस्था अध्यक्ष सतीश बागवे सर यांच्या सहकार्यातून उपस्थित दिव्यांग बांधवांना व त्यांच्या पाल्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. व त्याबद्दल आयोजकांकडून त्यांना धन्यवाद व्यक्त करण्यात आले.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.