You are currently viewing सावंतवाडीतील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदत…

सावंतवाडीतील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदत…

सावंतवाडी

तालुक्यातील पूरग्रस्तांना येथील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला.यावेळी १२० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.यात अनेकांचे नुकसान झाले.याच पार्श्वभूमीवर माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे,ओटवणे आदी भागातील नुकसानग्रस्तांना मुस्लिम बांधवांकडून ही मदत देण्यात आली. यावेळी १२० कुटुंबांना या मदतीचा लाभ देण्यात आला.

यावेळी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख , उपाध्यक्ष मुझिब शेख, यांच्या पुढाकारातून हे मदतकार्य करण्यात येत आहे. यासाठी सेक्रेटरी परवेझ बेग, खजिनदार शोहेब बेग, कायदेशीर सल्लागार हिदायतुल्ला खान, सदस्य बासित पडवेकर, अन्वर शहा, बाबासाहब दर्गावाले, इरफान शेख, शोहेब गनी, जुबेर पडवेकर यांनी खुप मेहनत घेतली आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा