You are currently viewing सावंतवाडीत भर वस्तीत असलेला उभा माड पेटला

सावंतवाडीत भर वस्तीत असलेला उभा माड पेटला

सावंतवाडी

येथील उभा बाजार परिसरात माडाने अचानक पेट घेतला. ही आज नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही. सुदैवाने पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी दिली. नेमकी आग कशी लागली याबाबत कोणालाही माहिती नाही. हे झाड भर वस्तीत आहे. त्या ठिकाणची घरे बंद आहेत. आकाशातून वीज पडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तरीही पेटलेली आग विझवण्यास पालिका पालिकेच्या बंबाला यश आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =