You are currently viewing नांदगावात उद्यापासून गौतमबुद्ध, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव…

नांदगावात उद्यापासून गौतमबुद्ध, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव…

नांदगावात उद्यापासून गौतमबुद्ध, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव…

कणकवली

तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची संयुक्त जयंती नांदगाव बौद्ध विकास मंडळातर्फे नांदगाव येथील बुद्धविहारात 10 ते 11 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.

शुक्रवार 10 मे रोजी सकाळी 9 वा. पंचशील ध्वजारोहण, 9.30 वा. त्रिसरन पंचशील व बुद्धपूजा पाठ, 11 वा. विविध खेळ, सायंकाळी 5 वा. भिमज्योत रॅली, रात्री 8 वा. स्नेहभोजन होईल. शनिवार 11 रोजी सकाळी 9.30 वा. त्रिसरन पंचशील व बुद्धपूजा, दुपारी 3 वा. महिलांचे स्नेहसंमेलन, रात्री 9.30 वा. विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, 9.45 वा. भंते धम्मानंद यांचे मार्गदर्शन, 10 वा. जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रामांना नांदगावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान अब्दूल गफूर साटविलकर, माजी सरपंच शशिकांत शेट्ये, प्रकाश कदम, सुनील तांबे, संदीप तांबे, राजेश तांबे, राहुल कदम,वसंत कदम, ग्रा. पं. सदस्य विठोबा कांदळकर, पूजा सावंत, विनोद मोरये, रुहिता तांबे, सुनील तांबे, सिद्धार्थ तांबे, संघवी तांबे, शर्मिला तांबे, अनिकेत तांबे, अजय तांबे, गिरीश तांबे, विश्‍वनाथ कदम, अजित तांबे, अतुल तांबे, अनिल ताबे, प्रणय तांबे, संदेश तांबे, अनिकेत तांबे, राजेश तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या जयंती उत्सवाला बौद्धबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बौद्ध विकास मंडळाने केले आहे.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा