You are currently viewing कुडाळातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांचा पर्यटनदृष्ट्या विकास

कुडाळातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांचा पर्यटनदृष्ट्या विकास

पर्यटन विभागाच्या सचिवांचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश

 

कुडाळ:

 

कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिराचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी पर्यटन विभागाचे सचिव यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अशा प्रकारे कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसराच्या विकासासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करत या देवस्थान परिसराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रादेशिक पर्यटन संचलनालयाच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसराचा विकास आराखडा बनवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक पर्यटन संचलनालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लवकरच अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून २३ देवस्थानांपैकी पहिल्या टप्प्यात ११ आणि पुढील टप्प्यात १२ देवस्थानचे परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित केले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा विकास होणार आहे. यात श्री देव कुडाळेश्वर मंदिर कुडाळ, श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस बुद्रुक, श्री सिद्ध महादेव मंदिर केरवडे कर्याड नारूर, श्री लिंग रवळनाथ मंदिर पोखरण, देवी भगवती मंदिर आंब्रड, श्री देव गिरोबा मंदिर भडगाव, श्री देवी भराडी मंदिर वाडीवरवडे, श्री देवी भावई मंदिर गोठोस, श्री देव जटाशंकर मंदिर मंदिर नेरूर कर्याद नारूर, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल, श्री देव स्वयंभू महादेव मंदिर पांग्रड, श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर इत्यादी देवस्थान परिसरांचा विकास पहिल्या टप्यात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =