You are currently viewing तळवणे, मळेवाड, कोडूरा, धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा गौण उत्खनन सुरू…

तळवणे, मळेवाड, कोडूरा, धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा गौण उत्खनन सुरू…

मनसेच्या माध्यमातून तहसिल कार्यालयासमोर ५ जूनला आंदोलन  – मनसेचे आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक

सावंतवाडी

तळवणे मळेवाड कोडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे )गौण उत्खनन सुरू असतांनाही महसूलकडून कोणतीही दखल न घेता चिरे खाण मालकांना पाठीशी घालणाचा प्रयत्न केला जात असल्याने मनसेच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयासमोर ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक व धाकोरे कोंडुरा तळवणे येथील मनसेच्या स्थानिक पदाधिकारी यांनी दिला आहे.
तळवणे धाकोरा व मळेवाड परिसरात गेले काही वर्ष मोठ्या प्रमाणात चिरे खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे यासाठी परवानगी घेतांना खाण मालक एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्‍याच जागेत चिरे उत्खनन करतात. सदर दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु करतात त्यामुळे बेकायदेशीर खाणीव्दारे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला जात असतांना महसुल विभागाकडून त्यांना अभय देण्यात येतो. बेकायदेशीर उत्खनाबाबत महसुलचे लक्ष वेधूनही काहीच हालचाली झाले नाही शिवाय प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करण्याची साधी तसदीही घेण्यात आली नाही त्यामुळे
येत्या ५ जूनला तहसिल समोर महसुल विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे असे श्री नाईक म्हणाले. सदर आंदोलनास मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − four =