You are currently viewing रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

इचलकरंजी : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने मे महिना हा युवा महिना म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला युवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने रोटरी प्रांत ३१७० चे पुढील वर्षीचे प्रांतपाल नासिर बोरसादवाला, कोल्हापूर हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी “सन्मानप्राप्त युवक युवतींच्याकडून आज होत असलेले कार्य आणि त्यातून मिळणारी ऊर्जा सर्वांच्यासाठीच प्रेरणादायी आहे. समाजात आज अनेकवेळा विदारक परिस्थिती आढळते, त्यासाठी युवावर्गाची निश्चितपणे मदत होऊ शकेल आणि सामाजिक दृष्टीने त्यांनी ती करावी” अशा आशयाचे उदगार काढले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या युवक, युवतींचा सन्मान करण्यात आला. कु. पूजा दानोळे (सायकलिंग – क्रीडा क्षेत्र), कु. स्नेहल माळी (सामाजिक क्षेत्र), सौ. ऋचा सारडा – बियाणी (शैक्षणिक क्षेत्र), अनिल भुतडा (व्यावसायिक क्षेत्र) आणि विवेक सुतार (गायन – सांस्कृतिक क्षेत्र) या सर्वांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सन्मानप्राप्त सर्व युवक, युवतींनी समयोचित व प्रेरणादायी मनोगत व्यक्त करताना आपली यशस्वी वाटचाल कशाप्रकारे झाली हे सांगितले.

कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले सहाय्यक प्रांतपाल पन्नालाल डाळ्या यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून युवकांचा गौरव केला. स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत कांबळे यांनी करून दिला. हसमुख पटेल यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले. याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांची सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी श्रीकांत राठी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =