You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस, महसूल, आरोग्यच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान…

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस, महसूल, आरोग्यच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान…

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस, महसूल, आरोग्यच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान…

मालवण

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज पोलीस, महसूल, सेतू व आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

येथील भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात येथील पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, सुप्रिया पवार, भक्ती शिवलकर, महसूल विभागातील, सेतू विभागातील तसेच आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा तसेच पालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी जान्हवी वायंगणकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शहर चिटणीस महिमा मयेकर, शहर युवती उपाध्यक्षा दिव्या कोचरेकर, बूथ अध्यक्ष स्नेहल पराडकर, ओबीसी सेल अध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, तारका चव्हाण आदी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा