You are currently viewing स्मार्ट ग्राम अभियानात कुंब्रल ग्रामपंचायत प्रथम

स्मार्ट ग्राम अभियानात कुंब्रल ग्रामपंचायत प्रथम

स्मार्ट ग्राम अभियानात कुंब्रल ग्रामपंचायत प्रथम आली असुन ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय १० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
या अगोदर या ग्रामपंचायतीला लोकराज्य ग्राम,आयएसओ मानांकन, संत गाडगेबाबा हगणदारी मुक्त गांव, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेत सतत दोन वर्षे पहिला व दुसरा क्रमांक,तालुक्यातील पेपरलेस ग्रामपंचायत ठरली आहे. सरपंच प्रवीण परब यांनाही राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे. तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत कुंब्रल ग्रामपंचायत ला ८६ गुण प्राप्त झाले आहेत. या यशा बद्दल ग्रा.पं. व सरपंच परब यांचे अभिनंदन होत आहे.
सरपंच प्रवीण परब हे अभ्यासू आणि गावाच्या विकासाला तळमळीने काम करणारे आहेत. या पुरस्करा बाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले ,वेळोवेळी ग्रा.पं. ला पुरस्कार मिळालेत हे सर्व ग्रामवासियांच्या एकीमुळे,सहकार्यामुळे तसेच सभागृहातील सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी यांच्यामुळे शक्य झाले. असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =