You are currently viewing राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

सावंतवाडी

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर – गोडकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव ई. मू. काझी यांची सहिनिशी याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाला आहे.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सहअध्यक्ष तर शिक्षण आयुक्त उपाध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून राज्य प्रकल्प संचालक, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त, योजना शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिषद अध्यक्ष, मुंबई महिला विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत, डॉ. दीपक म्हैसकर, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू सुहास पेडणेकर, पुणे ज्ञान प्रबोधिनीचे प्राचार्य मिलिंद नाईक आदी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा