You are currently viewing वाढत्या महागाईच्या विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

वाढत्या महागाईच्या विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

सिलेंडर, दुचाकीला हार घालून नाराजी; केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी….

सावंतवाडी

वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज येथे सावंतवाडी कॉंग्रेसच्या माध्यमातून मोेदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दुचाकी आणि सिलेंडर घेवून जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघू नार्वेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, महिला तालुकाध्यक्ष स्मिता वागळे, समीर भाट , कौस्तुभ गावडे, जास्मिन लक्ष्मेश्वर, आमिंदी मेस्त्री, सुमेदा सावंत, बबन डिसोजा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =