You are currently viewing मुणगे ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

मुणगे ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

देवगड / प्रतिनिधि :

 

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कुल आणि स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होके. कोर्सेसचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी आणि अकौंटिंग या दोन विभागातून प्रथम क्रमांक ईशा प्रमोद हिर्लेकर (८१.३३%), द्वितीय क्रमांक सायली सुभाष परब (७५.१७%),तृतीय क्रमांक दिपेश दिनेश लब्दे (७४.३३%) यांनी यश प्राप्त केले. एकूण ३७ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी दोन विध्यार्थी विशेष योग्यता, २४ विध्यार्थी प्रथम श्रेणीत तर ११ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर,उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − thirteen =