You are currently viewing घाटमार्गातील अवैध वाळू, चिरे वाहतूक रोखा –  परशुराम उपरकर

घाटमार्गातील अवैध वाळू, चिरे वाहतूक रोखा –  परशुराम उपरकर

कणकवली

सिंधुदुर्गातून अन्य जिल्ह्यातविनापरवाना वाळू वाहतूक व चार ब्रासच्या पासावर सहा ब्रास चिरे वाहतूक करण्यात येत आहे. कमी ब्रासने पास घेऊन जादा चिरे वाहतूक करत असलेल्या १२ टायरच्या विनापरवाना गाड्या, त्याचप्रमाणे वाळूच्या गाड्या कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याने त्या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक व सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अवैध वाहतूक रोखून शासन तिजोरीत महसूल वाढावा, यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस, तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे… -प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने वाळू धोरण आखून ६०० प्रतिब्रासने नागरिकांना वाळू देण्याचे निर्णय जाहीर केलेले असताना आज १७,००० ते २०,००० रुपयांना तीन ब्रास वाळू देण्यात येते. त्याचप्रमाणे सदर वाळूचे उत्खनन विनापरवाना वाहतूक होत असते. त्याचप्रमाणे चिऱ्यांसाठीही १२ टायर्सच्या गाड्या चार ब्रासचे पास घेऊन ६ ते ८ ब्रास चिरे वाहतूक कज्ञरत असतात. त्यामुळे शासनाला मिळणारा कर व महसूल मिळत नाही. सदर वाहतूक फोंडाघाट किंवा वैभववाडी घाटातून रात्री सातनंतर होत असते, असे म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा