You are currently viewing भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

*भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार*

राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने आम्हाला न्याय मिळाला असल्याचे भूविकास बँकेचे कर्मचारी उत्तम राणे, चंद्रकांत सरंगले यांनी सांगितले.आज त्यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देणी थकीत होती. आमदार वैभव नाईक यांनी भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यातील भूविकास बँकांच्या मालमत्ता शासनास हस्तांतरीत करुन त्यापोटी भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांची देणी अदा करणेसाठी रक्कम उपलब्ध करुन द्यावी व सदर रक्कम भुविकास बँकांकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेत समायोजित करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिले होते.त्यानुसार कार्यवाही होऊन कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, उपदान रक्कम , रजा पगार, नुकसान भरपाई रक्कम,महागाई भत्ता अशी सर्व रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ कर्मचाऱ्यांची १४ कोटी ५५ लाख २३ हजार एवढी रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 19 =