You are currently viewing पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचे धाडस का करतात तळीराम?

पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचे धाडस का करतात तळीराम?

पूर्वी पोलीस म्हटल्यावर थरकाप उडायचा, पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची कोणाची इच्छा नसायची. परंतु अलीकडे गैरधंदे करणारे, गुन्हेगार देखील अगदी आरामात सकाळ, दुपार, संध्याकाळी कधीही पोलीस स्टेशनमध्ये घुसतात, पोलिसांशी अरेरावीने बोलत त्यांचा अपमान करतात, त्यांना जुमानत देखील नाहीत. असाच प्रकार घडतो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये.
कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये सकाळ,दुपार,संध्याकाळ दोघे तळीराम घुसतात. पोलीस कर्मचार्यांशी अर्वाच्च भाषेत बोलतात. त्या दोघांच्याही तोंडावर ना मास्क असतो ना कोरोनाचे कोणतेही नियम ते पाळत. या दोघांपैकी एक जण कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील असल्याचे समोर येत आहे.
पोलीस स्टेशनमध्ये घुसणारे हे दोघेही भरधाव वेगाने दुचाकीवरून येतात. नशेत असल्याने त्यांना नीट चालताही येत नाही. असे नशाबाज तळीराम कोणत्याही वेळी पोलीस स्टेशनमध्ये येतात. पावशीतील भरदार शरीरयष्टी असलेला तळीराम कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये घुसण्याचे धाडस का करतो?
लॉकडाऊनच्या काळात गोवा बनावटीच्या दारूचा सुकाळ आहे. गोवा बनावटीची दारू विनासायास उपलब्ध होत असल्याचे या तळीरामांच्या पोलीस स्टेशनमधील उपद्रवावरून सिद्ध होत आहे. परंतु हे दोघे तळीराम पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना का सतावतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. तळीरामांच्या त्रास कुडाळ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी का सहन करतात? कुडाळ पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे त्यांच्याशी काय संबंध आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्यांची उत्तरे मात्र कुडाळ पोलीस स्टेशनमध्येच सापडू शकतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 5 =