शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित आ. वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष…..
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित आ. वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष…..

मुंबई

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पर्यटन विकास, शेतकऱ्यांना पीक विमा, सिंधुरत्न योजनेची अमंलबजावणी इतर अनुषंगिक विषयांबाबत तसेच दोन्ही जिल्ह्यातील इतर प्रश्न व समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आज बैठक संपन्न झाली. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरील प्रश्नांकडे लक्ष वेधले.लवकरच हे प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी कॅबिनेट मंत्री ना.आदित्य ठाकरे, ना. उदय सामंत, ना.दादा भुसे, ना.असलम शेख, ना.संदीपान भुमरे, ना.बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण आयुक्त अण्णा साहेब मिसाळ, सतीश सावंत, संजय पडते, विकास सावंत, व्हिक्टर डांटस, सर्व विभागांचे प्रधान सचिव, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा