You are currently viewing बांद्यात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद..

बांद्यात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद..

बांदा

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील बांदा केंद्रशाळेत ही स्पर्धा संपन्न झाली.

पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात नील बांदेकर, पवित्रा कदम, भक्ती केळुस्कर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्वज्ञ वराडकर याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
पाचवी ते आठवी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात श्रावणी आरावंदेकर, युक्ता सापळे, नैतिक मोरजकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. शमिका चिपकर हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. खुल्या गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रशासन’ व ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे अर्थकारण’ हे विषय देण्यात आले होते. या गटात सिद्धी सावंत, शुभेच्छा सावंत, नेत्रा राणे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. प्राजक्ता मोरजकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर परीक्षक महाबळेश्वर सामंत, रवींद्र गवस, सौ. विशाखा पालव, श्री प्रभू श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत निलेश मोरजकर यांनी केले.
श्री सामंत म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जोपसण्याचे काम श्री स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे विचार आचरणात आणून त्यांच्या मूल्यांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे. यावेळी विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, जे. डी. पाटील, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, अक्षय मयेकर, प्रथमेश राणे, अनुप बांदेकर, रीना मोरजकर, वेदिका गावडे, मिताली सावंत, शुभम बांदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सावंत, जे डी पाटील यांनी केले. आभार समीर परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =