You are currently viewing इन्सुली चेकपोस्ट वर 58 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

इन्सुली चेकपोस्ट वर 58 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

बांदा :

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज पर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. यात ५८ लाखाच्या दारूसह तब्बल ७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ११०० कागदी पुठ्याचे बॉक्स आढळले. गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रामधील तपशीलानुसार वाहन मालक विनोद पद्मनाथ राव, रा. पनवेल, जि. रायगड व फरार संशयीत अज्ञात वाहन चालक यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली संजय मोहिते, भरारी पथक निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर तानाजी पाटील, दिवाकर वायदंडे, जमनाजी मानमोड, स. दु. निरी गोपाळ राणे, सुरज चौधरी, रमाकांत ठाकुर तसेच जवान रणजीत शिंदे, संदीप कदम, देवेंद्र पाटील यांनी भाग घेतला. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, सीमा तपासणी नाका, इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =