You are currently viewing तीलारीच्या कालव्यात वृद्धाचा मृतदेह

तीलारीच्या कालव्यात वृद्धाचा मृतदेह

तीलारीच्या कालव्यात वृद्धाचा मृतदेह

दोडामार्ग

दोडामार्ग शहरातील वरची धाटवाडी येथे राहत असलेले सुरेश केशव गवस ( वय 73 ) हे शहरातून गोवा दिशेने गेलेल्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आज सकाळी मृत अवस्थेत आढळून आले. मूळ पिकुळे येथील असलेले श्री. गवस हे अलीकडेच दोडामार्गात स्थिरावले होते. आज सकाळी ते मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. बराचा वेळ झाला तरी ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली.

तेव्हा ते कालव्यातील पाण्यात सापडून आले. दोडामार्ग पोलिसांना याबाबतची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी गवस यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा