You are currently viewing जिज्ञासा फौंडेशन मालवण या सामाजिक संस्थे तर्फे पाणखोल जुवा बेट वरील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

जिज्ञासा फौंडेशन मालवण या सामाजिक संस्थे तर्फे पाणखोल जुवा बेट वरील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

मालवण

हल्ली झालेल्या सततच्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तसेच तळकोकणात देखील बरेच भाग नदीच्या पाण्याखाली गेले हडी येथील पाणखोल जुवा हे बेट देखील त्याचाच एक भाग परंतु भौगोलिक दृष्ट्या चारही बाजूने पाण्याने वेढलेले हे बेट दरवर्षी पाण्याखाली जाते त्यात ह्यावर्षीच्या अतिवृष्टीने पाण्याचे प्रमाण आणखी वाढले.ह्या गोष्टीची माहिती काहीच दिवसांपूर्वी जिज्ञासा फाऊंडेशन मालवण ह्या सामाजिक संस्थे च्या सदस्यांना तेथील नागरिकांनी कळविली त्यानंतर जिज्ञासा फाऊंडेशन या संस्थेने सर्वोतोपरी प्रयत्न करून मदत जमा केली व आज संस्थेच्या सदस्यांनी स्वतः भेट देत मदतीचा एक हात पुढे करत प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक साहित्य सुपूर्त केले.

या प्रसंगी संस्थे चे सभासद श्रेयस हिंदळेकर,सुदर्शन कांबळे,प्रतिक कुबल,रजत दळवी,चेतन जाधव,आदित्य तांबे आणि वैभव आजगावंकर हे उपस्थित होते तेथील नागरिकांनी देखील आपुलकीने जिज्ञासा फाऊंडेशन संस्थे चे आभार मानले.

सर्व सदस्यांकडून तेथील नागरीकांच्या माणुसकीच्या नात्याने समस्या जाणून घेत सर्व भागांची पाहणी केली नागरिकांनी प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली व आपली कैफियत संस्थेच्या सदस्यान समोर मांडली त्याचबरोबर जिज्ञासा फाऊंडेशन च्या वतीने नागरिकांना किनाऱ्यालगत असणाऱ्या खारफुटी वनांची जपणूक तसेच ते न तोडण्याची विनंती करण्यात आली जिज्ञासा फौंडेशन मालवण या सामाजिक संस्थे तर्फे प्रशासनाला ह्यासाठी ठोस पावले उचलून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात ह्या साठी विनंती करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा