वैभववाडी भाजपा महिला शहर अध्यक्षपदी विद्या पाटील यांची नियुक्ती..

वैभववाडी भाजपा महिला शहर अध्यक्षपदी विद्या पाटील यांची नियुक्ती..

वैभववाडी :

भाजपा महिला शहर अध्यक्षपदी विद्या पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर आ. नितेश राणे यांनी सौ. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. निवडीचे नियुक्तीपत्र भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांनी विद्या पाटील यांच्याकडे सुफुर्द केले आहे. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी सभापती अरवींद रावराणे, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण रावराणे, महिला आघाडी अध्यक्ष भारती रावराणे, प्राची तावडे, विद्या पाटील, संदीप पाटील, अक्षय पाटील, पाटील गुरुजी, उदय पांचाळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा