You are currently viewing कोरोनाचा रेड झोन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढवा

कोरोनाचा रेड झोन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढवा

आमदार नितेश राणे यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

कणकवली
रेड झोन मध्ये असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरेशा प्रमाणात पाठवा.लस कमी येत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे.आता शासन देत असलेला लसीचा साठा पुरेसा नाही.लसीचा पुरवठा वाढवा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा सध्या रेड झोनमध्ये आलेला असून कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनामार्फत लसीकरण मोहीम सुरू असून लस पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे लसीकरण वेगाने होत नसून रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होणारा लसचा पुरवठा हा प्रत्येक फेरीमध्ये १००० ते १३०० एवढाच उपलब्ध करून देण्यात येत आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्याला लसचा पुरवठा वाढवून दिल्यास लसीकरण मोहीम वेगाने राबवून जिल्हा रेड झोनमधून लवकरात लवकर बाहेर येण्यास मदत होईल . तरी याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =