You are currently viewing प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने कोरोनामुक्त गाव वायंगवडेचा सत्कार

प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने कोरोनामुक्त गाव वायंगवडेचा सत्कार

कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू, प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना प्रतिबंधक सामुग्री,मालवण येथील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट म्हणून प्रदान केल्यानंतर आज दि ३०/६/२०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कोरोनामुक्त गाव वायंगवडे ता. मालवणचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण वतीने आज वायंगवडे येथे संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असताना मार्च २०२० पासून वायंगवडे ता.मालवण या गावाने कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या दीड वर्षात गावाचे सरपंच श्री.आनंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्ययंत्रणा,गाव सनियंत्रण समिती, गावातील कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने कोरोना नियंत्रणासाठी अतिशय नियोजनबद्धपणे प्रयत्न करून गाव कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळविले आहे.
वायंगवडे गावाने अथक प्रयत्नांतून कोरोनावर नियंत्रण मिळवून आजपर्यंत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या वतीने आज ग्रामपंचायत वायंगवडे येथे कोरोनामुक्त गाव म्हणून ग्रामपंचायत वायंगवडेचा शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे यांच्याहस्ते सरपंच श्री.आनंद सावंत यांना सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा घोगळे,सुमित्रा घाडी, रमेश वायंगवडेकर,सीता मेस्त्री,ग्रामसेवक भुषण बालम,आरोग्यसेवक महादेव कोकरे, आशास्वयंसेविका संगीता राणे,शिक्षक सागर कुराडे, अंगणवाडी कर्मचारी मंजुळा परब,शिला वायंगवडेकर,प्रमिला वायंगवडेकर,प्रतिभा परब, कोरोना सनियंत्रण समिती सदस्य रुची गावडे, डाटा ऑपरेटर सुकन्या जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्निल सुद्रिक व राजू सावंत उपस्थित होते या सर्वांना तसेच स्वयंसेवक,बचत गटप्रमुख,गावातील सर्व शिक्षक, डॉक्टर,आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका,आशासेविका
तलाठी यांचा कोरोना योद्धा म्हणून संघटनेच्यावतीने सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.तसेच यापुढेही गाव कोरोनामुक्त राहावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर व मास्क भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून गाव कोरोनामुक्त ठेवल्याबद्दल सरपंच,कर्मचारी व ग्रामस्थ यांचे कौतुक केले व यापुढेही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना ग्रामसेवक भुषण बालम यांनी गेले दीड वर्ष गाव कोरोनानुक्त ठेवल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेने सर्वप्रथम शाबासकीची थाप मारून सत्कार केल्याबद्दल संघटनेचे आभार मानले.
यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे,मालवण तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर, सचिव संतोष परब,जिल्हा प्रतिनिधी मंगेश बागवे,स्पर्धा प्रमुख दयाळ मेस्त्री व कोषाध्यक्ष विनेश जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 11 =