You are currently viewing एनआयएची बनावट भारतीय चलन प्रकरणी मोठी करावाई

एनआयएची बनावट भारतीय चलन प्रकरणी मोठी करावाई

मुंबई:

 

बनावट भारतीय चलन प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएने गुरूवारी सकाळी मुंबईत ६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एनआयएने डी कंपनीशी संबंधित आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकले. तेथून तपास यंत्रणेने अनेक साहित्य जप्त केले आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२१ मध्ये २.९८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. आरोपी रियाज आणि नसीर या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन असून डी कंपनीची नेमकी भूमिका तपासात आढळून आली होती. एनआयए मुंबईच्या पथकाने बुधवारी या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांच्या घरे आणि कार्यालयांसह विविध मालमत्तांवर अनेक छापे टाकले.

प्रतिक्रिया व्यक्त करा