*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*कुत्ता गोळी*
नाव वाचून आपणांस विलक्षण अनुभव आला असेल हे नाव आहे हळुहळू आपल्या तरुणाईला लागलेले किड आणि तरुणाई संपणारा सर्वात मोठा आजार म्हणजे कुत्ता नशेची गोळी . नशा ही वाईटच असतें मग ती /सत्तेची असो/ पदाची असो./ सौंदर्य असो/ पैसा असो/ अशी वेगवेगळी नशा आज आपल्यात रुजणयास सुरुवात झाली आहे त्यापेक्षा घातक असते ती ही नशा.
आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जागोजागी अलिशान नशा विक्री करणारी दुकाने त्यात्या भागातील सरपंच. उपसरपंच. नगरसेवक. मुख्याधिकारी. नगरपालिका. महानगरपालिका. ग्रामपंचायत. राजकीय सामाजिक बगलबच्चे. यांच्या वरदहस्ता खाली रासरोस सुरू आहेत. नशेची पानं. मावा. गुटखा. अफू. चरस. गर्द. दारु. देशी विदेशी. नशेची इंजेक्शन. लाल मावा. 360.300.120 अशी सुगंधी आणि नशेची तंबाखू विक्री. जाफराणी. बनारस. कलकत्ता. गुलकंद. आणि विविध नावांनी ओळखल्या व तरुण पिढीला घातक असणार्या विविध नशेच्या गोळ्या त्यातील अतिशय घातक आणि माणसाला बार तास गुंगीत ठेवणारी गोळी म्हणजे कुत्ता नशेची गोळी होय.
आज नशा ही तरुण पिढीत फॅशन झाली आहे. आज काॅलेज शाळा विद्यालय महाविद्यालय यांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ नशेचे पदार्थ विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरुण मुलं. मध्यमवर्गीय लोक. वयस्क लोक. आज नशेच्या विळख्यात आहेत. त्या त्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पोलिस स्टेशन अन्न व औषध प्रशासन विभाग हे सर्व नशेचे पदार्थ विक्री करणारे यांच्यावर कोणती कारवाई करत नाहीत कारणं त्यांना या दुकानदार यांच्यापासून आर्थिक वाटा दिला जातो. असा दबक्या आवाजात सुर जनतेतून काढला जात आहे . अशा विविध नशेचे पदार्थ विक्री करणारे दुकानें यामुळे आज गुन्हेगारी. गुंडगिरी. दहशतवाद. बलात्कार. अपहरण. लुटमार. खून. मारामारया. भांडणं. टोळीयुद्ध. भ्रष्टाचार. अशा विविध कारणांसाठी जबाबदार असणारे तरुण याच दुकानांवर तयार होतात यामुळे आज शाळकरी मुली धोक्यात आहेत. महिला धोक्यात आहे. सर्वसामान्य कष्टकरी लोक सुध्दा धोक्यात आली आहेत. अश्या विविध कारणांसाठी जबाबदार असणारे तरुण गुंड या आणि अशा नशा विक्री करणार्या दुकानांवर तयार केले जातात. आज मेडिकल मधून सुद्धा नशेच्या गोळ्या विक्री केल्या जातात त्यांना कोणी विचारणारे आहे कां?? मेडिकल हे फक्त आणि फक्त मानवी शरीरासाठी डॉ सल्ल्यानुसार औषधं देण्याचा अधिकार आहे. त्यांना नशेच्या गोळ्या विक्री करण्याची परवानगी कोणी दिली आहे?? पण उघड कोणीच बोलत नाही . तरुणांना अधिक नशा यावी म्हणून ‘नायट्राझिपाम’, ‘अल्प्रोझोलम’ या औषधी गोळ्यांसह ‘कोरॅक्स’, ‘फेन्सिंड्रील’, ‘मिंलिन्टक कोडीन’ ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच आता दहा ते अठरा वयोगटातील मुले ‘स्टीकफास्ट’, ‘बॉण्ड’, ‘फेविक्विक’ या अॅडेसिव्हचाही नशेसाठी वापर करत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. झोपेच्या गोळ्या आणि कोरेक्ससारख्या औषधांची विक्रमी विक्री होत असताना अॅडेसिव्हचा वाढता वापर चिंतेचा विषय बनला आहे.
बाहेरच्या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या ‘अल्प्रोझोलम’ या झोपेच्या गोळ्यांना नशेबाज आणि विक्रेत्यांनी ‘कुत्ता गोळी’ असे सांकेतिक नाव ठेवले आहे. पोस्टर, बॅनर व फ्लेक्स चिकटवण्यासाठी जाणाऱ्या बॉण्डचा नशेसाठी शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मुले प्लास्टिक कागदावर बॉण्ड, स्टीकफास्ट, फेविक्विक या एडीसीव्हची मात्रा टाकून त्याचा वास घेतात. या वासातून झिंग येऊन नशा चढते, काही मुले बॉण्ड बोटाच्या आकाराच्या बाटलीमध्ये टाकून त्याचा वास घशात ओढतात व त्या नशेत धुंद राहतात. अलीकडे काही शाळकरी मुले वेदनाशामक आयोडेक्सचा वास घेऊन नशा करतात; तर काही जण आयोडेक्स ब्रेडला लावून खात असल्याचे आढळल्याचे बालमानस शास्त्राचे अभ्यासक व सामाजिक समस्या विश्लेषक महाराष्ट्राचे बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या या अंमली पदार्थांच्या आयातीवर तसेच विक्रीवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी छापे टाकून कारवाईची धडक मोहीम राबवायला हवी. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. परिणामी, हा धंदा तेजीत येऊन त्याचा विळखा बालकांसह तरुण पिढीलाही बसतो आहे. नशा यावी यासाठी शोधले जाणारे नवनवे अंमली पदार्थ मुलांचे बाल्य गिळंकृत करू पहात आहे,
कुत्ता’ नावाने परिचित व मुलामध्ये लोकप्रिय झालेली गोळी गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने विक्रीला आणली जाते. या गोळीची व अॅडेसिव्ह बॉण्डची किंमत २५ ते ६० रुपये तर झिंग आणणाऱ्या औषधाची किंमत ८० ते १०० रुपये इतकी आहे. कमी किंमतीत नशा होत असल्याने या अंमली पदार्थाचा वापर राज्यातील नाशिक, नंदुरबार, धुळे, मालेगाव, पालघर, ठाणे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती सांगली. सातारा. सोलापूर. कोल्हापूर. रत्नागिरी. या शहरातील झोपडपट्टी भागात जोरात सुरू आहे. नशेच्या गोळ्या सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे असं एका सर्वे मधून ध्यानात आलं आहे. कारणं याच सर्व जिल्ह्यात गुन्हेगारी. प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
नायट्रो-१० (गुन्हेगारांच्या भाषेत डी, दो-टेन) आणि अशाच दुसऱ्या दोन गोळ्या घेतल्या की दोन बंपर दारू प्यावी, अशा मोडमध्ये (नशेत) संबंधित व्यक्ती जातो. त्यामुळे त्याने काय केले, कसे केले, कुणाच्या सांगण्यावरून केले, ते दोन-चार दिवस त्याच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याला थर्ड डिग्रीच काय कोणतीही डिग्री दिली तरी त्याचा थंड प्रतिसाद असतो. अनेक गुन्ह्यांच्या तपासातूनही हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अल्प किमतीत मिळणाऱ्या या गोळ्या औषध म्हणून दिल्या जातात. संबंधित सूत्रांनुसार, वेदनेची तीव्रता कमी व्हावी. कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करता यावा, यासाठी या गोळ्यांचा रुग्णांसाठी थोडक्या प्रमाणात वापर केला जायचा.
विशेष म्हणजे, या गोळ्यांचा डोस निद्रा (झोप) दूर ठेवतो. अफू (काला माल) पेक्षा खूप कमी किमतीत त्या मिळत असल्याने त्यामुळे लांब पल्ल्याची वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर या गोळ्यांचा वापर करू लागले.
आता गुन्हेगारांनी आपल्या पाठीराख्यांना, सुपारी देणाऱ्यांना, भाईंना पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी या गोळ्यांचा वापर सुरू केला आहे.
अन्न व औषधी विभाग हा साखर झोपेत आहे. प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये खाजगी मेडिकल. व पानपट्टी. यामध्ये आज नशेच्या गोळ्या सरास विकल्या जात आहेत. त्यांच्या सुध्दा बोलाविता धनी वेगळाच आहे. त्यामुळे ह्या विभागांचे काहीच चालत नाही कां. यांना दुकानदार हप्ते देतात काय असा मोठा प्रश्न आज सर्वसामान्य लोकांच्या पुढे आ वासून उभा आहे. विशेष मोहिमेसाठी पोलिस देणारसध्या अन्न व औषधी विभागाकडे कर्मचारी नसल्याबाबत सांगण्यात आले असल्याने शहरातील स्टॉकिस्ट, होलसेल विक्रेते, तसेच मेडीकल स्टोअर्स याच्या रेकॉर्डच्या तपासणीसाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस बंदोबस्त देण्याचाही निर्णय घेण्यात आला
मेडिकलमध्ये हा घटक असलेल्या अल्पेक्स- 0.25 अल्प्राक्स. 0.5 या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1500 हजार गोळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेषतः या गोळ्याची गरजे पेक्षाजास्त प्रमाणात दिसून आल्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या आजारांसाठी या गोळ्या देता येत नसताना मेडिकल चालकाने या गोळ्याची मागे त्याला सर्रास विक्री केल्याच देखील निदर्शनास आला आहे.या नंतर प्रत्येक गावात आज नशेच्या पदार्थ विक्री साठा उपलब्ध आहे एवढेच काय पण शहरातील काही खासगी डॉक्टर कडे देखील हा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला.या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..या नंतर ग्रामीण भागात नशेसाठी वापरली जाणारी साधन बदलली आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आता पर्यंत दारूच्या व्यसनाने घरदार उध्वस्त झालेले आपण पाहिले काही लोकांनी आपली जंगम स्थावर संपत्ती विकली काम काही तरुण आपली नशेची लथ पूर्ण करण्यासाठी पडेल ते काम करायला लागले. बायका पोर आई वडील यांना नशेमुळे आज तरुण पोरके झाले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संगत आज एकामेकांच्या संगतीने मुल बाद होत असतील मात्र दारू सोबतच नशेसाठी वापरल्या जणाऱ्या पदार्थाची नावे ऐकल्यावर पाया खालची वाळू सरकेल.. झोपेच्या आजारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, कोडीन युक्त सिरप, नाकाने नशा करण्यासाठी व्हाईटनर,पेट्रोल,चिटकवण्यासाठी वापरले जाणारे (फेव्हीकॉल, स्टिकपास्ट,सुलोचन) याचा देखील नशा करण्यासाठी वापर केला जात असल्याचे व्यसनमुक्तीसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात गेल्या २५/३० वर्षात सरकारने उचललेल्या खंबीर पावलांमुळे थेट नशा देणार्या वस्तूंच्या व्यवहाराला आळा बसला. पण नशेबाज ते नशेबाजच ,त्यांनी मान्याताप्राप्त नशेचा मार्ग शोधून काढला. हा मार्ग म्हणजे त्याचा वापर ही औषधे म्हणजे औषध कंपन्यांची डोकेदुखी असते. त्यांनी उत्पादीत केलेली औषधे मानसिक रुग्णासांठी किंवा तत्सम आजारासाठी असतात पण वापरकर्ते मात्र औषधांचा उपयोग नशेसाठी करतात.दुर्दैवाने जगात दुःखाला, चिंतांना तुटवडा नाही. त्यामुळे त्यांचा बाजारही कायम तेजीत असतो. आपल्याला थेट ‘सातवे आसमान में’ घेऊन जाणाऱ्या या नशिल्या औषधांचा परिणाम थेट मेंदूच्या कार्यप्रणालीवर होतो हे मात्र या बाजारातल्या गिऱ्हाईकाला कळलं तरी वळत नाही. आपल्याकडे गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणारी कुत्ता गोली यापैकीच एक या ड्रगचा उपभोक्ता वर्ग आहे मुख्यतः शाळेतली आणि कॉलेजमधली पोरं पोरी. हो; या व्यसनाची चटक अगदी शाळकरी पोरापोरीनाही लागते. सांकेतिक भाषेत या गोळीला ‘बटन’ हे नाव आहे. या गोळीचा पाऊच आरामात खिशात मावू शकतो. त्यामुळे तिची विक्री करताना रंगेहाथ पकडणं कठीण होऊन बसतं. त्यातच काही महाभाग या गोळ्या योग्य तिथे ‘पोहोचवण्यासाठी’ लहान मुलांचाही वापर करतात.
कुत्ता गोली हे मुळात एक औषध आहे जे झोप येण्यासाठी घेतलं जातं. या औषधाचं शास्त्रीय नाव आहे अल्प्राझोलाम. पूर्वी आपल्या आई किंवा आजी यांच्या तोंडून आपण कॉम्पोज हे नाव ऐकलं असेल, तर हेच ते औषध. डोकं शांत ठेवण्यासाठी, रात्री शांत झोप लागण्यासाठी ही कॉम्पोजची गोळी घेतली जायची. आज मात्र ही गोळी नशेसाठी घेतली जाते. आता यात नवीन असं काही नाही. अनेक औषधांचा नशेसाठी म्हणून वापर केला जातो. यासाठी मुख्यतः खोकल्यावरची औषधं, वेदनाशामकं, झोपेची औषधं वापरली जातात. कुत्ता गोली मध्ये अनेक उत्तेजक रसायनांचं मिश्रण वापरलं जातं. ही गोळी घेतल्यानंतर शरीराला एक प्रकारची बधिरता येते. कुठल्याही वेदना जाणवत नाहीत. पुढे पुढे या गोळीची चटक लागते. या गोळीत असलेल्या अल्प्राझोलाममुळे व्यक्तीला झोप येते आणि ती मिळाली नाही तर जीव कासावीस होतो. अशी व्यक्ती मग बेभान होऊन अक्षरशः कुत्र्याप्रमाणे हिंसक बनते. त्यावरूनच हे औषध ‘कुत्ता गोली’ या नावाने प्रचलित आहे.
नशेच्या गोळ्यांचे व्यसन असल्याचे सांगितले होते. यानिमित्ताने या प्रकारच्या व्यसनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या आहेत. त्यात अनेक कंपन्याचा सुळसुळाट आहे. औषधी वापरासाठीच्या या गोळ्या आता नशेबाजीसाठी सर्रास घेतल्या जात आहेत. खोकल्यांच्या औषधांचे अधिक प्रमाणात सेवन करूनही शाळकरी मुले नशेबाजी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरातील ज्येष्ठांसाठी म्हणून ही मुले औषध दुकानांमधून ती मागवतात. काही औषध विक्रेते याबाबत कल्पना असूनही जादाचे पैशाच्या हव्यासापोटी विना डॉक्टरांची चिठ्ठी या गोळ्या देतात. त्यातून या नशेबाजीला मोकळे रान मिळते.दारू, गांजा, ब्राऊन शुगर यासाठी जादा पैसा खर्च होतो. त्याला पर्याय म्हणून व्हाईटनर, पंक्चर काढण्याचे सोल्युशन, कालबाह्य झालेली औषधे नशेखोरीसाठी घेतली जात असल्याचे दिसून आले आहे. आता त्यात भर म्हणजे वेदनाशामक औषधे, बधिरपणा येण्यासाठीच्या औषधी गोळ्या, झोपेच्या गोळ्या घेतल्या जात आहेत. काहीजण औषध दुकानदारांनी अशी औषधे द्यायला नकार दिला असता, त्यांनाच दमदाटीचे प्रकार घडले आहेत. अशा गोळ्या ऑनलाईनही मिळू लागल्याने आता तोही अडथळा आता पार झाला आहे. नशेच्या गोळ्यांच्या खुलेआम विक्रीवर आता कोणाचे नियंत्रण उरलेले नाही. आक्रमक आणि छातीठोक दावे, त्यावर कफनीचे कवच आणि रुद्राक्षाची कुंडले! मग पॅथीचा पंथ बनतो. रुग्णाईत भक्त होतात. धन्वंतरींच्या हाती आता जलौका आणि अमृतकुंभ नव्हे, तर त्रिशूळ आणि हलाहल दिसायला लागते. अफूची गोळी हीच ज्यांचा धर्म आहे अशांनी धर्माची अफू गोळी व्यवसायात घोळली की चढणारी नशा औरच. अशा नशेत विज्ञान आणि विवेकाचा बळी जाणार हे ठरलेले. हे वेळीच रोखायला हवे. तरच ‘आम्ही भारताचे लोक’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खरे पाईक ठरू.
वर्तमानकाळात सर्वाधिक महत्त्वाचं विकास साधन म्हणजे शिक्षण! एकीकडे तंत्रज्ञानाचा अंगीकार, दुसरीकडे गुणवत्तेस प्राधान्य व तिसरीकडे सर्वांना शिक्षण अशी त्रिसूत्री घेऊन काम केल्याशिवाय आपण वर्तमान समाज बदलू शकणार नाही. पदवी हे पैसे मिळवायचं साधन नाही. ते जीवन साध्य आहे. ज्ञान हे कौशल्य आहे, पाठांतर नाही. नोकरीपेक्षा उद्यम, व्यापार, व्यवसाय हाच विकासाचा खुश्कीचा मार्ग आहे, पण तो सचोटीने करायला हवा. अशा अनेक गोष्टी शिक्षणविषयक काही लेखातून आल्या आहेत. स्त्री शिक्षणाचा ढाचा पुरुष शिक्षणापेक्षा वेगळा करणं, स्त्री व नोकरी यांचा नवा ताळमेळ बसवणं (विशेष सवलती, सुविधा देऊन), शिवाय हक्क सुरक्षित ठेवणं या सर्वातून ‘समतेची नवसंकल्पना उदयास येणार आहे याचे भान आपल्या राजकत्र्यांना व नियोजकांना दिसत नाही. धोरणातील लवचीकता, दीर्घ पल्ल्याचे नियोजन, लोकसंख्या नियमन, बेरोजगारी संपवण्याचा धडक कार्यक्रम, अर्थपुरवठा व वसुलीची कठोरता यातूनच बांधील समाज जीवन उदयास येईल, हे सांगणारे सदर लेख वर्तमान शतकाचे प्रश्नच मांडत नाहीत, तर जगाची उदाहरणे अधोरेखित करत आपणाला बदलास भाग पाडतात, अशी माझी धारणा आहे. हे लेखन त्याच ध्यासातून केले गेले आहे. एकविसावे शतक नव-नव्या संकल्पनांचे जसे आहे, तसे ते नव-नव्या प्रश्नांचेही आहे, याचे भान या पुस्तकातून झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी उद्याचं जग नवरचनेचं करण्याचा संकल्प सोडला असेल त्यांना हे पुस्तक ते आकारण्याचा मार्ग दाखवील. पूर्वपुण्याई, पूर्वविचार, पूर्वेतिहास यावर जगण्याचे दिवस संपले. ‘अपना हाथ जगन्नाथ’ मानून जे एकनाथ पुरुषार्थी बनतील उद्याचे जग त्यांचेच असेल, हे समजावणारे सदर पुस्तक आपण सर्वांनी मुळातूनच वाचावे.
आपल्या देशांचे भविष्य असणारी तरुण पिढी आज नशेच्या विळख्यात अडकलेली आहे. आणि सर्वच ठिकाणी राजकीय लोक ही गोरगरीब कुटुंबातील मुल. जी आज बेरोजगार आहेत त्यांनाच टार्गेट करून नशेच्या अधिन करून त्याचे सर्व जीवन आज बरबाद करतांना आपणांस पाहावयास मिळत आहे.
अशा सर्व नशेच्या पदार्थ विक्री करणारे यांच्यावर शासन प्रशासन राजकीय. सामाजिक हे कांहीच कारवाई करणार नाहीत कारणं त्यांना सर्वसामान्य गोरगरीब यांच्या मुलांना गुंडच बनवायचे आहे . आपणासच आवाज उठविला पाहिजे. नशेची विक्री बंद केली पाहिजे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-