कुडाळ-काळपनाका येथे दुचाकी व रोड रोलर यांच्यात अपघात, चालक गंभीर…
कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ-काळपनाका येथे दुचाकी व रोड रोलर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र भास्कर बागकर (वय ६५, रा. नेरुरपार-बांधीवडेकर टेंम्प) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान स्वतःच्या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी श्री. बागकर यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र बागकर हे वैयक्तिक कामानिमित्त ओरोस येथे गेले होते. यावेळी तेथून परत येत असताना कुडाळ काळापनाका येथे ओव्हरब्रिजवर दुचाकी वरील ताबा सुटल्याने ती समोर येणाऱ्या रोड रोलरला आदळून अपघात घडला. या अपघातात त्यांच्या पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी त्यांच्यावर स्वतःच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार सुबोध मळगावकर यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार श्री. शिंगाडे करीत आहेत.