You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून पांदन व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून पांदन व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

नगरसेवक ॲड. विराज भोसले यांच्या मागणीला यश

कणकवली

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. तसेच सोनगेवाडी येथे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. ह्या आधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गार्डनचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याबरोबरच आशिये रोड ते पवार चाळ, आशिये रोड ते पवार घर पांदन व पराष्टेकर घर ते गुलमोहर कॉम्प्लेक्स डांबरीकरण रस्ता या कामांचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक आशुतोष कुबल, लवू पवार व बाळा पराष्टेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.
कणकवली शहरातील अनेक कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. माझ्या प्रभागाला सर्व सुविधांनी परिपूर्ण केल्याबद्दल जनतेच्या वतीने या कामाबद्दल जनतेच्या वतीने ॲड. विराज भोसले यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी उदय पवार, प्रभाकर पवार, शंकर पावसकर, मधुकर शिरकर, हनुमंत राजापूरकर, शिवराम पवार, शिल्पा पवार, समीर पवार, राजेंद्र जाधव, प्रकाश चव्हाण, अजित पारधीये, अमोल पराष्टेकर, महेंद्र सावंत, तेजस पराष्टेकर, अक्षय आजगावकर, नेहा पराष्टेकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =