You are currently viewing झोपडी जाळलेल्या “त्या” परप्रांतीय कुटुंबाला सामाजिक बांधिलकी कडून मदतीचा हात

झोपडी जाळलेल्या “त्या” परप्रांतीय कुटुंबाला सामाजिक बांधिलकी कडून मदतीचा हात

सावंतवाडी

अज्ञाताकडुन झोपडी जाळण्यात आल्याने उघड्यावर पडलेल्या बाहेरचावाडा येथील रमेश जाधव यांच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकीकडून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी त्यांची झोपडी उभारण्यासोबत जीवनावश्यक वस्तू त्यांना पुरविण्यात आल्या यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व त्यांचे सहकारी संजय पेडणेकर, समीरा खलिल, सतिश बागवे, शैलेश नाईक, शरद पेडणेकर, प्रसाद कोदे, श्याम हळदणकर, अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार हेलन निब्रे आदींनी पुढाकार घेतला.
श्री. जाधव यांची झोपडी अज्ञाताकडुन जाळण्यात आली होती. हा प्रकार सहा दिवसापुर्वी घडला होता. ते घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञाताकडुन हा प्रकार करण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर जाधव यांचा संसार उघड्यावर आला होता. त्यामुळे सामाजिक बांधिलकीकडून त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा