You are currently viewing सावंतवाडीत वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा

सावंतवाडीत वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने “वृत्तबद्ध कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी येथे रविवार दि.१४ मे सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. त्याकरिता नांव नोंदणी करावी असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे मार्गदर्शक काव्यगुरू-कवी-गझलकार विजय जोशी (विजो) ( डोंबिवली, मुंबई ) आहेत. एकदिवसीय प्रत्यक्ष कार्यशाळा रविवार दि. १४ मे रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सावंतवाडी येथे संपन्न होईल. त्यानंतर दोन महिने व्हॉट्सॲप समूहात श्री.विजय जोशी सर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेतील. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी, म्हणजे नियोजन करणे सोयीचे होईल.

या “कार्यशाळेत मात्रा म्हणजे काय..? त्या कशा मोजतात..? आणि त्याचा सराव घेण्यात येईल.

वृत्त म्हणजे काय..? मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद यांची माहिती आणि सराव. गझलतंत्र आणि सराव. प्रश्नोत्तरे आणि खुली चर्चा असे नियोजन आहे. सदर कार्यशाळेतील उपस्थितांचा वेगळा व्हाट्सअप समुह बनवून तिथे जवळपास पुढील दोन महिने विविध वृत्तातील कविता, गझल रचना यांचा सराव आणि यासंबंधीचा इतर अभ्यास ऑनलाईन घेतला जाईल.

कार्यशाळा नावनोंदणीसाठी संपर्क:-

कवी श्री.दीपक पटेकर:- ८४४६७४३१९६ (व्हॉट्सॲप) /

श्री.संतोष सावंत, तालुकाध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी.९४२३०५१५३०. नाव नोंदणी झालेल्यांना इतर सविस्तर माहिती व्हॉट्सॲप समूहात दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे : दोन महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर वृत्तबद्ध कवितांची स्पर्धा घेतली जाईल, त्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त कवी/कवयित्रिंना प्रा.डॉ. जी. ए. बुवा पुरस्कृत रोख पारितोषिक व सन्मानपत्र दिले जाईल तसेच 14 मे रोजी धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती कार्यक्रम आहे होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष.ॲड संतोष सावंत यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 4 =