नरडवे व अरूणा धरण प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा – संदेश पारकर

नरडवे व अरूणा धरण प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा – संदेश पारकर

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी…

कणकवली
नरडवे देवधर व अरूणा धरण प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या श्री.पाटील यांची आज श्री.पारकर यांनी भेट घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर; अवधूत मालणकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा