You are currently viewing ठाण्यात निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात

ठाण्यात निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात

ठाणे :

कृष्णा प्रकाशन, ठाणे, स्वराज सेवा मंडळ आणि नुपूर आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव २०२६, पुस्तक प्रदर्शन व विक्री साहित्य सोहळा शुक्रवार दि. २४ ते रविवार दि.२६ एप्रिल २०२६ ला, हा साहित्य सोहळा सायंकाळी ६ ते १० या वेळेत शिवनेरी मैदान, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) या ठिकाणी संपन्न.

या साहित्य सोहळ्यात शनिवारी २५ एप्रिल २०२६ रोजी एका निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन केले होते. काव्य संमेलनाचे संयोजन पत्रकार कवी विनोद पितळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले होते. ह्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर होते. सौ. सुप्रिया हळबे, संजय सोनवणे, ॲड. रुपेश पवार, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र गोसावी, राजा रावळ, या सर्व मान्यवर कवी, कवयित्रींने आपल्या कविता सादर करून, शिवनेरी मैदानात नवचैतन्य निर्माण केले. अनेक दर्जी ठाणेकर नागरिक, मान्यवरांनी काव्य संमेलनाला आपली उस्फूर्त हजेरी लावून हा कार्यक्रम झगमगीत केला. एकेक कवितांचे सादरीकरण होत असताना रसिक, प्रेक्षक मैदानात येत होते आणि मंत्रमुग्ध होत होते. असे हे काव्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण होते. अशा ह्या काव्य मैफिलीत पाऊस, प्रेम, वात्सल्य, समाज जीवन राजकीय जीवन या विविध विषयांवर कविता सादर झाल्या.

यात कवी ॲड. रुपेश पवार यांनी सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धावर “निर्वासित पक्षी” ही वास्तववादी कविता सादर करून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवले. यानंतर त्यांनी माणसाची मनोभूमिका स्पष्ट करणारी “माणूस” ही कविता सादर केली.

या साहित्य सोहळ्याचे तीन दिवसीय आयोजन साहित्यिक पत्रकार विद्याधर ठाणेकर यांनी केले. विद्याधर ठाणेकर यांनी आपल्या कवी मित्रांचे नेहमीप्रमाणे यथोचित स्वागत केले व आभार मानले.

 

नाट्य तुषार संस्था

प्रतिक्रिया व्यक्त करा