You are currently viewing मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्त करण्याची राष्ट्रवादीचे रुपेश जाधव यांची मागणी….

मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्त करण्याची राष्ट्रवादीचे रुपेश जाधव यांची मागणी….

कणकवली

कणकवली शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून या जनावरांचा नगरपंचायतीने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांनी केली आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर सातत्याने मोकाट जनावरे रात्री आणि दिवसा पाहायला मिळतात. तसेच कणकवली शहरांमध्ये मोकाट जनावरांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या जनावरांमुळे शहरांमध्ये वाहनचालक व नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.याची दखल कणकवली नगरपंचायत घ्यावी आणि या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे रुपेश जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा