*बालकांनी आनंद लुटला अनोखा उपक्रम बाहुली नाट्य आणि सादरीकरण देखील*
दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी
गोल्डन लेटर्स बालविकास संस्था
प्रोजेक्ट पाटी पुस्तक
याच्या अध्यक्षा डॉ राणी खेडीकर
यांनी ट्रस्ट चा एक उपक्रम म्हणून ,ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्य शाळेत तीस बालकांनी सहभाग घेटला होता.आयडीयल स्कूल मधील ही बालके पाटी पुस्तक या प्रकल्पात सामील आहे. CEAT Tyres CSR सामाजिक विभाग यांनी कार्य शाळेसाठी डॉ राणी यांना जागा उपलब्ध करून दिली होती.
सौ.कल्पना गवरे स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा तसेच निवृत्त प्राचार्या नेरूरकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज डोंबिवली यांना पाचारण केले होते.कल्पना गवरे मॅडम यांनी सी. सी.आर. टी.( सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग,न्यू दिल्ली) येथून पपेटीयर म्हणून सरकारमान्य प्रशिक्षण घेतले आहे.त्यांनी आजवर भारतात मुंबई ,पुणे,औरंगाबाद,सातारा ,हैदराबाद , दिल्ली अशा विविध ठिकाणी १५०( दीडशे )पपेट शो आणि पपेट कार्यशाळा घेतल्या आहेत.आदरणीय गवरे मॅडम यांनी परदेशात सुद्धा २० पपेट शो आणि पपेट कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अशा या अनुभवी शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली . कार्यशाळेत एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांचा या कार्यशाळेत सहभाग होता.तिथे मुलांना पपेट कसे बनवले जातात याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सौ.कल्पना गवरे मॅडम यांच्यासोबत जेष्ठ गझलकार श्री.रवींद्र सोनवणेही उपस्थित होते.त्यांनी मुलांना कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केले. मुलांकडून वेगवेगळे पपेट बनवून घेण्यात आले.आणि त्यांनी बनवलेल्या पपेटच्या व्यक्तिरेखेसाठी संवाद लेखनही करून घेण्यात आले.कल्पना चावला, पीटी उषा, राणी लक्ष्मी बाई आणि राणी अहिल्याबाई असे चार गट तयार करून त्यात मुलांची विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक गटाला वेगवेगळे टास्क देण्यात आले होते.त्यानंतर मुलांनी तयार केलेल्या पपेटनुसार त्यांच्याकडून संवाद लिहून घेऊन त्यांचे सादरीकरण करण्याचा सराव करून घेण्यात आला.आणि छोटेखानी एक सादरीकरण स्पर्धाच या चार गटांत घेण्यात आली होती.तिथली सर्वच मुले हुशार होती.त्यामुळे पहिला दुसरा नंबर कुणाला द्यावा हा प्रश्न परीक्षकांना पडला होता.इतक्या सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही पपेट शो स्पर्धा पार पडली. कार्यशाळेत विविध पपेट बनवणे आणि त्यांचे सादरीकरण करणे या गोष्टीत सर्व मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.सर्व मुले खूप हुशार आणि चुणूकदार होती. आदरणीय सौ. गवरे मॅडम यांनी पपेट शो सादर केल्यावर आणि तो शो बघितल्यावर उपस्थित सर्व मुले भारावून गेली आणि उतस्फुर्टपणे सौ. गवरे मॅडमच्या अवतीभवती गोळा झाली.मॅडम पुन्हा कधी येणार पपेट शो घ्यायला आणि आम्हाला पपेट कसे बनवतात हे प्रशिक्षण द्यायला? निरागस मुलांच्या ह्या प्रश्नांना ऐकून मन भावुक झाले होते.अगदी चार तासांच्या सहवासात त्या गोड निरागस मुलांना पपेट आणि पपेट शो करणाऱ्या गवरे मॅडम यांचा लळा लागला होता.खरोखर मुले ही देवाघरची फुले.त्यांच्या मनात कोणताही भेदभाव नसतो निरागस असतात.याची प्रचिती आम्हाला या कार्यशाळेत मिळाली
सौ कल्पना गवरे
नवी मुंबई
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-